आरोग्य विषयक

नवभारत फर्टीलायझर लिमिटेड कंपनीतर्फे शेतकऱ्यांना जैविक खते, औषधी बद्दल माहिती

शशांक चौधरी

दिवसेंदिवस रासायनिक व हानिकारक खते कीटकनाशकांचा अतिवापरामुळे शेताच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात होणारी घट व मानवाच्या जीवनाला होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी नवभारत फर्टीलायझर चे अधिकारी अक्षय सोलव, पवन काळे यांनी सिरसो ता. मुर्तिज़ापुर जिल्हा. अकोला येथील शेतकऱ्यांना जैविक शेती व सेंद्रिय शेती बद्दल नवभारत फर्टीलायझर लिमिटेड कंपनी च्याअधिकाऱ्यांनी सेंद्रिय शेती व जैविक शेती बद्दल माहिती दिली. तसेच कंपनीद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येणारे जैविक सेंद्रिय शेती बद्दल निशुल्क मार्गदर्शन तसेच इतर सेवांबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

 येणाऱ्या काळामध्ये जैविक व सेंद्रिय शेती करणे आवश्यक असून आतापासून शेतकऱ्यांना जैविक शेती व सेंद्रिय शेतीकडे वळावे यासाठी लागणारे आवश्यक मार्गदर्शन कंपनीतर्फे निशुल्क पुरवले जाईल असा विश्वासही कंपनीचा अधिकारी यांनी दिला त्यावेळी उपस्थित शेतकरी यांना दिला. तसेच या कार्यक्रमाला गावचे प्रगतिशील शेतकरी अशोक दहिकर, रोशन बाले, गजानन काडलकर, सुनील मेहरे, गजानन बेलसरे व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!