सामाजिक

सुसंस्कार संपन्न विद्यार्थी तयार होण्यासाठी संस्कार वर्गाची स्थापना

धामणगाव रेल्वे –

संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांचा आदर्श ठेऊन कार्य करण्याची वसा चालवीत तरुण पीढीत वाढते व्यभिचार तरुणांमध्ये व्यसनाधीनता याला बंद करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कल्पनेतील तरुण घडविण्याचे काम हनुमंत ठाकरे करीत आहे. ग्रामगीताचार्य हमुमंत ठाकरे यांनी सुसंस्कार संपन्न विद्यार्थी तयार होण्यासाठी संस्कार वर्गाची स्थापना केली असून जवळपास ३०० विद्यार्थी या संस्कार वर्गात रोज उपस्थित राहतात. यामधून ग्रामगीता तत्वज्ञान शिकविले जाते अलीकडे गेल्या ३० वर्षपासून समाज कार्याची आवड म्हूनन संपूर्ण जीवन समर्पित समाजासाठी केले आहे.

संस्कार वर्गातुन अध्यात्म, थोरांचे चरित्र, रामायण, महाभारत कथा, ग्रामगीता, सामाजिक विषय, नैतिक मूल्य, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, थोरांचे चरित्र, आदर्श महापुरुष यांच्या कथा, आई वडिलांची सेवा, भोजन संस्कार, सामुदायिक ध्यान, सामुदायिक प्रार्थना, व्यक्तिमहत्व विकास इत्यादी विषय सांगून आदर्श विध्यार्थी दिनचर्या सोबत जगत आहे.
            हा उपक्रम डॉक्टर मुकुंदराव पवार संकुलात ग्रामगीताचार्य हामुमंत ठाकरे यांनी सुरू केला असून आजची तरुण पिढी घडविण्याचे कार्य करत आहेत.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!