अमरावती –
‘व्हॅलेंटाईन डे ‘च्या निमित्ताने होणारे अप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याविषयी तहसीलदार साहेब तसेच पोलिसांची विशेष पथके नियुक्त करणे, महाविद्यालय परिसरात गस्त वाढवणे, वेगाने वाहने चालणाऱ्यांवर कारवाई करणे आदींविषयी अमरावती येथे जिल्हाधिकारी तसेच दर्यापूर आणि मुर्तीजापुर या तालुक्यांमध्ये पोलीस प्रशासन महाविद्यालय तहसीलदार यांना हिंदू जनजागृती समितीच्या वतीने धर्म प्रेमींनी निवेदन दिले. तसेच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी होणारे अप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याविषयी शाळा, महाविद्यालायमध्ये सुद्धा निवेदन देण्यात आले.
यावेळी मंगेश सोळंके, दुर्गेश सोळंके, विनोद सरकटे, सूरज खंडळकर, धनंजय देव, राजेश भसीन, जयराजसिंह बयस, निलेश कावडकर, मनोज वाघ, सतिष गुल्हाने, संतोष ढोकणे, विशाल लोथे, दिनेश धोत्रे, मुकेश काळे, ज्योतिराम मोरे, कृष्णा कराळे, गौरव बैताळे, ओम राणे, स्मिता महामूने, आकांक्षा हजारे उपस्थित होते.
Post Views: 198
Add Comment