क्रीडा स्पर्धेमध्ये मागील ४ वर्षांपासून परंपरा कायम राखत कासारखेडा गावाचे नाव केले उज्वल
धामणगाव रेल्वे –
तालुका तसेच जिल्हा स्तरावर सलग तिसऱ्यांदा गावाचा मान राखत कासारखेड जि. प. शाळा येथील् विध्यार्थ्यानी गावाचे नाव लैकिक केले आहे. सामान्य कुटुंबातील पूर्वी नितेश मगर, व श्रावणी अंकुश कालसर्पे या मुलींनी जिल्हा क्रिडा स्पर्धेत अव्वलस्थान पटकावून शाळेचे तसेच गावाचे नाव लौकिक केले आहे. गावातील शाळेला क्रीडा मैदान उपलब्ध नसताना सुद्धा विध्यार्थीनी जिंकण्याची जिद्द मनात ठेवून सतत ४ वर्षांपासूनअव्वलस्थान पटकविण्याची परंपरा कायम ठेवली. तसेच सन्मान गुणवत्ता सन्मान प्रेरणा, शाळा सिद्धी, सुंदर शालेय परिसर, क्रीडा स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, लोकसहभाग व इतर विविध उपक्रमामध्ये कासारखेडा शाळा तालुक्यामध्ये अव्वल ठरली आहे.
त्याबाबद्दल या विद्यार्थिनीचे त्यांचे शिक्षक, सरपंच, उपसरपंच तसेच गावातील सर्व नागरिक यांनी मुलींचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
Post Views: 324
Add Comment