धामणगाव रेल्वे सामाजिक

मानवता बुद्ध विहारात त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी

धामणगाव रेल्वे

दत्तापूर येथील आठवडी बाजारातील मानवता बुद्ध विहारात मोठ्या उत्साहात माता रमाई जयंती साजरी करण्यात आली. सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन मानवता बुद्ध विहार कमिटी तर्फे आयोजित करण्यात आले असून सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. त्यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच माता रमाई यांच्या जीवनावर चिमुकल्यानी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला, यामध्ये अनीक्षा राऊत, रिया राऊत, तक्षवी भैसारे, यश भैसारे, धर्यश भैसारे, अंश नंदेश्वर, भुमिका राऊत, त्रिशा भैसारे इत्यादींचा समावेश होता.

चिमुकल्यानी अक्षरश माता रमाई सारख्या वेशभूषा धारण केल्याने कार्यक्रमात वेगळीच रंगत आली, तर मोठ्या संख्येने विहारात महिला वर्गाची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे संचालन तन्वी सावध हिने केले तर आभार प्रदर्शन गुंजन राऊत हिने केले…

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!