Uncategorized

सुनेच्या तोंडात “अॅसिड” ओतून सुनेची सासऱ्यानेच केली हत्या

"सासऱ्याचे भयानक कृत्य समोर"

बरेली / प्रतिनिधी : मित्रांनो हे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. उत्तरप्रदेशातील बरेली येथे एका २१ वर्षीय तरुणीची हत्त्या चक्क तिच्या सासऱ्यानेच केली आहे. हत्त्या करण्याचे कारण फक्त एवढेच की त्या तरुणीच्या घरच्यांनी जास्त हुंडा न दिल्यामुळे ही हत्त्या करण्यात आली. तोंडामध्ये अॅसिड ओतून निर्घृण हत्त्या करण्यात आली.

मृत विवाहितेचे यशोदा देवी अशे नाव आहे. तिचा विवाह ओमकार यांच्यासोबत २१ फेब्रुवारी २०१९ ला झाला होता. सासरे व त्यांच्या घरचे फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेवरून उत्तर प्रदेशमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सून रात्री झोपली असता तिच्या खोलीत जाऊन तोंडात ओतले नंतर सकाळी सर्व घरातील सदस्यांना समजताच पळ काढला.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!