Uncategorized

सोन्याचा दरात पुन्हा वाढ !

दिल्ली : जानेवारीपासुन सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असुन सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर ३८४७० रुपये होता. भारतीय रुपयाची किंमत घसरत असल्याने व सोने आयात शुल्कात वाढ केल्याने सोन्याचा भाव वाढत चालला आहे.

सण, उत्सव व लग्नसराईच्या काळात सोन्याला जास्त मागणी असते. तसेच काही ग्राहक सोन्याचे भाव वाढायला लागले म्हणुन खरेदी करुन ठेवत असतात, तर काही ग्राहक फायदेशीर गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात. त्यामुळे आगामी काळात सोन्याचे भाव अजुन वाढु शकतात असे सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

जानेवारी २०१९ पासुन प्रतिदहा ग्रॅम तब्बल ७००० रुपयांची भाववाढ झाली आहे. मागील काही महिन्यांपासून सातत्याने होत असलेली भाववाढ पाहता लवकरच सोने ४०,००० चा आकडा पार करेल असे दिसत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!