शैक्षणिक

शेंदुरजना खुर्द जिल्हा परिषद आणि एकता विद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी – प्रथमेश वानखडे

जिल्हा परिषद शाळा शेंदुरजना खुर्द मध्ये मोठ्या उत्साहाने ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्यामध्ये ध्वजारोहण व सत्कार समारंभ व तसेच शिवकालीन पुराण प्रदर्शनी आणि डान्स अशाप्रकारे विविध उपक्रम राबविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ अरुणाताई विनोद चटुले, तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. शितलताई संतोष समोसे (सरपंच) व सुनील जांबवाले (उपसरपंच) आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रताप अडसळ (आमदार) व महादेव समोसे (मा.उपसभापती पं.स) बाळासाहेब शिरपूरकर (मा.सरपंच) सौ हर्षदाताई धोटे (मा.सरपंच) गणेश नागोराव गावंडे (मुख्याध्यापक जि.प.शाळा) श्री मनोहरराव तुपट (शा.व्य.स.उपाध्यक्ष) अतुलभाऊ देशमुख (मा.उपसभापती) आणि श्री प्रकाश माणिकराव वाढे (मा.केंद्र प्रमुख) व तसेच ग्रामपंचायत व जि.प.शाळा कडून आमदार यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नियोजन व प्रदर्शनी व तसेच उत्कृष्ट काम केल्याबद्दल आमदार यांनी सौ. शिक्षिका कांचन मकरंद खेडकर यांचा सत्कार केला. आणि अशाच प्रकारे गावकऱ्यांनी खूप छान प्रतिसाद देऊन कार्यक्रम पार पडला.

एकता विद्यालयात सुद्धा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला

तसेच गावात दुसरीकडे एकता विद्यालय मध्ये मोठा जल्लोष या मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला विविध नाट्य नृत्य आणि लेझीम चे प्रदर्शन झाले आणि अशाच प्रकारे बेटी बचाव बेटी पढाव या विषयाला धरून एक सुंदर छान नाट्य प्रदर्शन केले प्रदर्शनी करनारे आर्या चांबट, विशाखा ठाकरे पूर्वा धोटे, वृषाली तुपट, भूमिका सयाम,आरती समोसे,नंदिनी चटुले,भैरवी राऊत उन्नती देशमुख, जानवी काळे, समीक्षा लांडे, दिपाली शेंडे, दीक्षा भास्कवरे, या विध्यार्थ्यांनीेने केले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष प्रदीपबाबू देशमुख होते तर प्रमुख अतिथी म्हणून शरदचंद्रजी देशमुख सर होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुरुची वानखडे हिने केले, प्रास्ताविक मुख्याध्यापक खोपे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन जांबवाले मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणारे स. शि. उईके सर, संजू दवळे, सुधाकर राऊत हे होते. आणि विद्यार्थीनी या कार्यक्रमाला भर भरुन प्रतिसाद दिला.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!