संपूर्ण ४० हजाराचा मुद्देमाल हस्तगत ; इब्राहिमपुर बग्गी येथे घडली होती घटना
धामणगाव रेल्वे –
दिवसाढवड्या घरातून ३८ हजाराचे सोन्याचे दागिने सह रोख रक्कम २ हजार असा एकूण ४० हजाराचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि. ०४ मार्च २३ रोजी इब्राहिमपुर बग्गी येथे घडली होती. फिर्यादी विनोद मोतीराम कांबळे, वय ३८ वर्ष, यांच्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तिवविरुद्ध कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेची ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांनी तातडीने दखल घेत अवघ्या ५ तासात गुन्हा उघडकीस आणून आरोपी निलेश पांडुरंग राऊत, वय ५३ वर्ष रा. इब्राहीमपुर बग्गी याला अटक करीत चोरी गेलेला संपूर्ण ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी हा फिर्यादीसोबत मजुरीचे कामावर जात होता व फिर्यादीस मजुरीचे पैसे मिळालेले आहेत हे आरोपीस माहिती होते, आरोपीने फिर्यादीवर पाळत ठेवून फिर्यादी हा घरात नसताना दिवसा घरात घुसून चोरी करून एकूण ४० हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. फिर्यादीस गुन्हा घडल्याबाबत सविस्तर विचारपूस करून काही संशयित इस्मांना ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली असता त्यापैकी आरोपी निलेश पांडुरंग राऊत, वय ५३ वर्ष रा. इब्राहीमपुर बग्गी याने सदर चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करून त्याचे राहते घरातून मेमोरंडम पंचनामाप्रमाणे चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारीअशीत कांबळे, स्थागुशाचे पो. निरीक्षक किरण वानखडे यांचे मार्गदर्शनाखाली पो. स्टे. तळेगाव (दशासर) येथील ठाणेदार रामेश्वर धोंडगे सह हेड कॉन्स्टेबल सचिन गायधने, पवन आलोने, पो. कॉन्स्टेबल संदेश चव्हाण, गौतम गवळे, मनीष कांबळे, डीएचसी पंकज शेंडे यांनी केली आहे..
Post Views: 64
Add Comment