क्राईम

वडीलांच्या प्रेयसीनेच अपहरण करीत ३ वर्षीय मुलीची केली निर्घृण हत्या

पाय कापून मृतदेह दिला जनावरास खाण्यास फेकून 

 उत्तर प्रदेश –  जनसूर्या मीडिया

उत्तर प्रदेशातील रामपूरमधील बिलासपूर येथे एका ३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून त्यानंतर तिची विकृत पद्धतीने निघृण हत्या करण्यात आली आहे. ही हत्या मृत मुलीच्या वडीलांच्या प्रेयसीने केली असल्याचे समजते. या भयंकर घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी मृत मुलीचे वडील दानिश यांनी रामपूर येथील पोलिस स्थानकात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. तक्रार नोंदवल्याच्या तीन दिवसानंतर मुलीचा मृतदेह एका मोकळ्या भूखंडावर फेकून दिलेल्या अवस्थेत आढळला. दोन्ही पाय कापलेले आणि शीर एका प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून फेकण्यात आला असल्याने भटक्या प्राण्यांनी त्यावर हल्ला केला असल्याच्या खूणा आढळून आल्या.
मुलीची हत्या तिच्याच वडिलांच्या प्रेयसीने केली असल्याचे पोलिस तपासात आढळून आले. रविवारी मुलगी दुकानातून चॉकलेट आणण्याकरीता शेजारील दुकानात गेली होती. त्यावेळी वडिलांच्या प्रेयसीने तिचे अपहरण केले. बराच वेळ उलटला तरी मुलगी घरी न आल्याने घरातल्यांनी मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली. दिवस उलटून गेल्यानंतरही मुलीचा शोध न लागल्याने दानिश यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
मंगळवारी सकाळी एका मोकळ्या भूखंडावर मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बुधवारी आरोपी फरनाज (२०) हिला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरनाज आणि दानिश यांचे प्रेमसंबंध होते. पण दानिशला तिच्याशी लग्न करायचे नव्हते. फरनाज आणि दानिशची पत्नी यांचे फोनवर अनेकदा वाद देखील होत. याच सूड भावनेने तिने संधीचा फायदा करत मुलीचे अपहरण करून, गळा आवळून तिचा खून केला. याशिवाय रात्रीच्या वेळी सामसूम झाल्यानंतर घराच्या गच्चीवरून मोकळ्या भूखंडावर मृतदेह फेकून दिला. जेणेकरून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मृतदेह असल्याचे समजणार नाही. तसेच जनावरांनी मृतदेह खाल्ल्यानंतर केलेल्या गुन्ह्याची उकलही होणार नाही.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!