धक्कादायक पुणे

२७ वर्षीय शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार..आरोपी शिक्षिकेस अटक

पुणे- जनसूर्या मीडिया

खडक पोलिस ठाण्याचे हद्दीत एका इंग्लिश मिडियम शाळेतील २७ वर्षीय शिक्षिकेने स्वत:ची लैंगिक इच्छा भागविण्यासाठी, दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रेमाच्या जाळयात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षिकेविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर, आरोपी शिक्षिकेस अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला या शिक्षिका असून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक पदावर काम करत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची शाळेचे कालावधीत पालकत्वाची शिक्षिक या नात्याने संपूर्ण जबाबदारी आपली असते हे माहिती असताना देखील, त्यांनी १० वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचा अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्याच्या सोबत प्रेमसंबंध जुळवले. तो प्रिलियम परिक्षेस शाळेत हजर असताना, त्यास प्रेमाची भुरळ पाडून शारिरिक संबंधासाठी प्रोत्साहित व उत्तेजीत करुन आपल्या शरीर सुखासाठी त्याचा वापर करुन त्याच्याशी शाळेच्या आवारात शारिरिक संबंध प्रस्थापित करुन अल्पवयीन विद्यार्थ्याची लैंगिक सतावणूक केली. याबाबत खडक पोलिस पुढील तपास करत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!