क्राईम

२४ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार ; आरोपी अटकेत

पाचही आरोपीना दोन दिवसाची पोलीस कोठडी

वरुड –

आई जवळून लाहिच्या बहाण्याने नेत पाच नराधमांनी तालुक्यातील एका २४ वर्षीय तरुणीवर आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना २८ जानेवारी रात्रीच्या दरम्यान घडली. पीडितेच्या तक्रारीवरून पाचही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शेंदूरजनाघाट पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तर न्यायालयाने पाचही आरोपीना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी महेश वाघमारे वय २५, पिंटू हरले वय ३९, रमेश भलावी वय ४०, इस्माईल खा वय ६५, नितीन ठाकरे वय २५ सर्व रा. मालखेड असे आरोपींचे नावे आहेत. आरोपी महेश वाघमारे याने २४ वर्षीय फिर्यादी पीडितेला तिच्या आईकडून तुमच्या मुलीला लाहिकरिता मालखेड ला खेऊन जातो असे सांगून मालखेड ला घेऊन गेला. पीडितेला रात्रभर शेतातील घरी ठेवून आरोपी महेश वाघमारे, पिंटू हरले यांनी तिच्यावर बळजबरी अतिप्रसंग केला. त्यानंतर रमेश भलावी, इस्माईल खा, नितीन ठाकरे हे सुद्धा तिथे पोहोचले आणि त्यांनी सुद्धा पीडितेवर आळीपाळीने बलात्कार केला तसेच आरोपीने पीडितेला लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. सदरची घटना २८ जानेवारीच्या रात्री घडली.
            २९ जानेवारी रोजी पीडितेने पोलीस स्टेशन गाठून घडलेली आपबिती कथन केली. त्यानुसार शेंदूरजनाघाट पोलिसांनी पाचही आरोपी विरोधात भा. द. वि. चे कलम ३७६ ड, ३२३ नुसार गुन्हा दाखल करून सर्व आरोपीना अटक केली आहे. तसेच न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सतीश इंगळेसह शेंदूरजनाघाट पोलीस करीत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!