अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांना तूर्तास दिलासा
अमरावती प्रतिनिधी
मौजे नवसारी येथील भूखंडात हेराफेरी केल्याप्रकरणी अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे यांना राज्याच्या वने व महसूल विभागाने २२ मे रोजी जारी केलेल्या निलंबन आदेशावर शुक्रवारी स्थगिती देण्यात आली.
महसूल विभागाच्या कक्ष अधिकारी प्रगती विचारे यांच्या स्वाक्षरीने सुधारित आदेश जारी केले आहे. विशेष म्हणजे निलंबनाचे आदेशही प्रगती विचारे यांनीच जारी केले होते.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीची खुली जागा खासगी व्यक्तीच्या नावे बेकायदेशीर हस्तांतरण करण्याचा प्रयत्न झाला. भूखंडाच्या हेराफेरी प्रकरणात तहसीलदार लोखंडे यांची ही कृती खासगी व्यक्तीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लाभ देणारी ठरली तसेच यात लोखंडे हे सहभागी असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे तहसीलदार लोखंडे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले होते. यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीचे कारवाई करण्याच्या अधिनतेने तहसीलदार लोखंडे यांचे निलंबन करण्यात आल्याचे आदेशात नमूद होते. मात्र, २४ मे रोजी महसूल विभागाने सुधारित आदेश जारी केल्याने तहसीलदार लोखंडे यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
Post Views: 89
Add Comment