मानवतेला काळिमा फासणारी घटना
जनसूर्या मीडिया :
रायगड जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. रायगडमध्ये ८० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी दिली.
माणगाव पोलिसात या प्रकरणी १८ वर्षांच्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जुलै महिन्यात हा घृणास्पद प्रकार घडला. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
रायगडमधील माणगाव तालुक्यातील निजामपूरमध्ये ८० वर्षांच्या वृध्द महिलेवर बलात्कार झाला. त्याच गावातील रहिवाशी असलेल्या सिध्देश घोणे (वय वर्ष १८ ) याने अत्याचार केला. पीडित वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. महिलेने विरोध केला असता तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. माणगाव पोलिस ठाण्यात पिडीत वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
निजामपूरमधील ८० वर्षीय सुलोचना तुकाराम जोशी या आयटीआय कॉलेजच्या शोजारी राहतात. त्यांच्यावर १८ वर्षीय सिद्धेश सतिश घोणे याने वारंवार बलात्कार केला. कुणाला सांगू नये म्हणून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. जुलै महिन्यात आरोपीने पीडित महिलेच्या घरात घुसून बळजबरी शारीरिक संबंध ठेवले. १९ डिसेंबर रोजी आरोपीने पुन्हा वृद्ध महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेने विरोध केला असता जबरी मारहाण केली. खाली जमिनीवर आपटले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने हिम्मत करत आरोपीच्या विरधात पोलिसात तक्रार दिली.
माणगाव पोलिसांनी याप्रकरण गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सिद्धेश सतिश घोणे याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पुष्करज सुर्यवंशी, निवृत्ती बोऱ्हाडे, पोलीस अंमलगार सोपान भोसले या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Post Views: 4
Add Comment